रस्त्यांच्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण सह उष्णतेचा कहर
भिगवन / प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशामध्ये रस्त्यांचे विस्तृत असे जाळे तयार झाले आहे प्रधानमंत्री असो व मुख्यमंत्री सडक योजना असो याद्वारे ग्रामीण किंवा शहरी भागात खूप मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन वाढवण्याकरता रस्त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात झाले असून लोकांना दळणवळण करता चांगले रस्ते झाले आहेत चांगल्या प्रकारे रस्ते झाले आहेत मात्र याचा दुष्परिणाम ही झालेला दिसून येत आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते करताना खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाले आहे हे सत्य कोणीच नाका करू शकत नाही वास्तविक पाहता महामार्ग वरील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे नियोजन प्रशासन अगोदरच करत असते जर प्रशासन रस्ते नियोजन अगोदर करत असते तर वृक्ष लागवडीचे नियोजन का अगोदर करत नाही याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सतावत आहे कारण चालू परिस्थितीमध्ये तापमान 40 ते 50 डिग्री सेल्स पर्यंत पोहोचले आहे परिणामी लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांचा आरोग्याचा खूप मोठा प्रश्न सध्या स्थितीमध्ये उद्भवू लागला आहे कारण रस्ते बनवण्याकरता वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने पावसाचे कमी प्रमाण उष्णतेचा कहर झालेला दिसून येत आहे शासनाने येथून पुढच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला नुसती झाडे लावले नाही पाहिजे तर त्याचे संगोपनाचेही जबाबदारी घेतली पाहिजे जेणेकरून येथून पुढच्या काळामध्ये नागरिकांना स्वच्छ हवा उष्णतेपासून संरक्षण मिळू शकेल शासनाने कंत्राटदारांना झाडेही लावायला दिले आहेत ते मात्र नुसता तरवड कंत्राटादार नुसते बिल पास होण्यासाठी लावतात फोटो काढून बिले घेतात पण त्याचे संगोपन करत नाही या गोष्टीवर नक्कीच विचार करण्याची गरज आहे पाठीमागे पाहिलं तर महाराष्ट्रातील तापमान 23 ते 24 डिग्री सेल्सिअस असायचे आत्ताच एवढी तापमानात वाढ का खऱ्या अर्थाने वृक्षतोडीचा फटका हा सर्व नागरिकांना बसत आहे कारण एक झाड मोठं वाढवण्याकरता किमान दहा वर्षे लागतात तर नंतर ते झाड चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन देते इथून पुढे वृक्ष लावल्यावर ते केव्हा झाड ऑक्सिजन देणार हे काळजी करण्याची बाब आहे म्हणून शासनासह प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लावून त्याचे संगोपनाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने महामार्गाच्या दुतर्फा साईटला वृक्ष लागवड करून संगोपन करून गेलेली शुद्ध हवा परत मिळवण्याकरता , केवळ आणि केवळ शासनाने वृक्ष लागवडी वरती काम करणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे
