पुणे

रावनगाव ते भिगवण परिसरात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट?

Spread the love

वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

संपादकीय | महा 24 तास

राजेगाव ते भिगवण या परिसरात कथित अवैध व्यवसाय आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. या प्रकारांमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून, अनेक कुटुंबांच्या संसारावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या परिसरातील कथित अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात तसेच वीरधवल बाबा जगदाळे यांनीही निवेदनाद्वारे अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, या मागण्यांनंतरही संबंधित प्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे पोलीस आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रशासन नेमकी भूमिका घेणार कधी?

समाजातील अनैतिक व बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ निवेदने स्वीकारून किंवा आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष कारवाई दिसणे गरजेचे आहे.

राजेगाव ते भिगवण परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित ठिकाणांची चौकशी करून अवैध व्यवसाय आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आता तरी प्रशासन जागे होणार का?

परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या चांगले वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या तक्रारींची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *