महाराष्ट्र

उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात!

Spread the love

‘विकसित भारत @2047’चा संकल्प; भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अकोला : सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या उगवा मंडळाच्या वतीने बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा ज्योती यात्रा’ व ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. सेवा, समर्पण आणि विकसित भारताच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात लोणाग्रा येथील शहीद सुमेध गवई यांच्या स्मारकापासून करण्यात आली. यावेळी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण, वादन, दीपप्रज्वलन, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विविध मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन स्क्रीनद्वारे उपस्थितांनी ऐकले. ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी विकसित भारताच्या उभारणीसाठी सामूहिक शपथ घेतली. प्रमुख अतिथींच्या हस्ते सेवा ज्योती प्रज्वलित करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर सेवा ज्योती यात्रेला प्रारंभ झाला.लोणाग्रा येथून निघालेली मोटारसायकल रॅली हातला मार्गे आगर गावातून मार्गस्थ झाली. या यात्रेच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यात आला.हा कार्यक्रम विधानसभा मुख्य प्रभारी तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोला लोकसभा खासदार अनुप धोत्रे, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, अंबादास उमाळे, राजू नागमते आणि उगवा मंडळ अध्यक्ष गणेश लोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाला किशोर खोले, बाळकृष्ण ठाकरे, हिम्मत देशमुख, किरण ठाकरे, अनिल हलवणे, अक्षय ढोरे, रवि खारोडे, अमोल अटकर, मार्तंड पाटील, धीरज सोनोने, गजेंद्र खोटरे, उगवा मंडळ सरचिटणीस प्रदीप खोले, किसान मोर्चाचे अध्यक्ष दिगंबर थोटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष बलवंत गावंडे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिवशंकर पाटील डिक्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *