बारामतीमहाराष्ट्र राजकारण

ॲड. भूषण जगताप यांची भाजपा जिल्हा ग्रामीण युवा मोर्चाचा सचिव निवड

Spread the love

राजेगाव /प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा ग्रामीण (पश्चिम) सचिव पदी सांगवी ता. बारामती येथील येथील युवा नेतृत्व ॲड. भूषण जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दौंडचे आमदार राहुल कुल तसेच पुणे जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष वैभव सोलनकर आणि ॲड.हर्षद जगदाळे यांच्या हस्ते बारामती येथे अधिकृत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले .ॲड.भूषण जगताप यांनी गेल्या दहा वर्षांपासून या परिसरात सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. युवकांचे संघटन आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया ॲड. भूषण जगताप यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *