इंदापूरक्रिडा

आदर्श माध्यमिक विद्यालयाने तालुका स्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक : शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी*

Spread the love

*भिगवण दि. २४ वार्ताहर:

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ अंतर्गत भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित *आदर्श माध्यमिक विद्यालयाने इंदापूर तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका सौ.सुचिता साळुंके यांनी दिली*.
*पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे , शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे जिल्हा परिषदेचे (माध्यमिक ) शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते विद्यालयाला सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे सचिव नंदकुमार सागर , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे,अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता साळुंके , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *