दौंडस्पर्धा परीक्षा

जेईई ॲडव्हान्स परीक्षेत सृष्ठी खैरे चे दैदिप्यमान यश; ऑल इंडिया रँकिंगमध्ये 1062 वा क्रमांक!

Spread the love

राजेगाव /प्रतिनिधी

भारतीय तंत्रज्ञान संस्थांची प्रवेशिका असलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘जेईई ॲडव्हान्स परीक्षेत सृष्ठी अनिल खैरे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सृष्टीने ऑल इंडिया रँकिंगमध्ये 1062 वा क्रमांक पटकावून तालुक्याच्या व परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुष्टी ने पहिली ते दहावी पर्यत शिक्षण राजनाथ गुरुकुल येथे झाले आहे तिचा सत्कार यावेळी करण्यात आला . या वेळी प्रमुख पाहुणे गुरुनाथ सावंत संस्थेचे अध्यक्ष नवनाथ काळे,
, प्राचार्य प्रिया खैरे मॅडम, उपप्राचार्य प्रमोद खंडाळे यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .आणि श्री नवनाथ काळे यांनी तिला पुढील शैक्षणिक अभ्यास करण्यासाठी एक टॅब भेट दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *