शेतकरी सरकारच्या लुटीच्या धोरणामुळे कर्जबाजारी. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांचा सरकारवर घणाघात
भिगवन प्रतिनिधी
शनिवारी दि 9 ऑगस्ट रोजी डिकसळ या ठिकाणी ऊस व दूध परिषदेत आयोजन केलं याच पार्श्वभूमीवर भिगवन येतील विश्राम ग्रहामध्ये सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेत आयोजन केले होते पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील , सुरेश खोपडे निवृत्त आयपीएस अधिकारी, डॉ चंद्रकांत कोलते मा जी , प ,सदस्य पुणे , अँड, अजित काळे कालिदास आपेट, सदिश कुरेशी अमरावती सह महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते , यावेळी रघुनाथ पाटील यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या चुकीच्या शेतकरी विरोधातील धोरणावर तीव्र स्वरूपाचा निषेध करून राज्य सरकार शेतकऱ्यांना आणखीनच कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य प्रकारे भाव मिळावा , 2009 ते 2010 साली ऊसाला दुप्पट भाव उसाला मिळत होता मात्र गेली सतरा वर्ष उसाचा भाव स्थिर असून , सरकारने ऊसाला भाव तरी द्यावा अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतर कमी करावे म्हणजे दुसरा कारखाना आल्यावर ती आम्ही त्यांच्याकडून योग्य प्रकारे भाव घेऊन असा इशारा त्यांनी सरकारला दिला , त्याचप्रमाणे देवेंद्र फडणीस यांनी 2015 साली गोवंश हत्या कायदा अस्तित्वात आणल्याने नको असलेले जनावरे विकली जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे नमूद केले 1980 मध्ये शेतमालाला भाऊ उत्तम होता , किमान दुधाचे भेसळ जरी थांबली तर दुधाला भाव योग्य मिळेल यासाठी सरकारने पहिला कायदा रद्द करून दुसरा कायदा अस्तित्वात आणल्याने सहजासहजी पैसे भरून भेसळ करणारे इसम सुटत असल्याने हा कायदा सरकारच्या फायद्यासाठी बनलेला आहे असा घनाघात त्यांनी केला, त्याचप्रमाणे एक लिटर गाईच्या दुधात एक लिटर डिझेल व एक लिटर म्हशीच्या पैशात एक लिटर पेट्रोल यावे ही मागणी त्यांनी या पत्रकार परिषेद्वारे सरकारकडे केली, सुरेश खोपडे यांनी जन सुरक्षा कायदा विरोधात लढत राहण्याचे व हा कायदा पॉलिटिकल असल्याचे सांगितले शेतकऱ्यांचे भलं शेतकरीच करू शकतो हे त्यांनी आवर्जून सांगितले, डॉ चंद्रकांत कोलते यांनी सरकार शेतकऱ्यांना गुन्हेगाऱ्या सारखं वागवते हे सांगून देवेंद्र फडणीस सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी सरकार असल्याचे सांगितले व शेतकऱ्यांनी न्याय देण्याचे काम हे प्रसारमाध्यम म्हणजे पत्रकारच करू शकते हेही त्यांनी सांगितले , महिलाचं संरक्षण करण्यातही सरकार अपयशी ठरत असून उद्योगपतीचे सरकार कर्ज माफ करते मात्र शेतकऱ्यांना वेटीस धरते , कुठल्याही मंत्र्यांनी मागणी न करता शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या वरती होणारा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले, अमरावती वरून आलेले सय्यद कुरेशी यांनी गोवंश कायदा रद्द करण्याची मागणी केली . या पत्रकार परिषदेमध्ये रघुनाथ दादा पाटील यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिला की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जर हिताचे निर्णय झाले नाही तर खूप मोठ्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल व होणाऱ्या गोष्टीला सरकार जबाबदार राहील तसेच त्यांनी यावेळी ऊस व दूध परिषद डिकसळ या ठिकाणी सर्वांना हजर राहण्याच्या आव्हान केले.
