बोरजुनी येथे झालेल्या मातंग समाजाच्या जीवघेण्या घटनेच्या निषेधार्थ भिगवन पोलीस स्टेशन येथे निवेदन दाखल
भिगवन/प्रतिनिधी
मातंग समाजावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या सन्मानावर केलेला भ्याड डाव आहे. मौजे बोरजुनी, ता. उमरी, जि. नांदेड येथे घडलेली घटना हा समाज विघातक प्रवृत्तींचा पुरावा आहे. जे लोक जातीच्या नावावर हिंसाचार करून आपली ताकद दाखवतात, ते खरे तर कमकुवत आणि भ्याड आहेत.मातंग समाज नेहमीच प्रगती, शिक्षण, आणि समाजहितासाठी झटत आला आहे. पण आजही मातंग समाजावर वारंवार हल्ले केले जात आहेत, ही बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला लाजिरवाणी आहे. अन्याय सहन न करणारा आणि लढा देणारा मातंग समाज. खऱ्या अर्थाने जातिवाद चालतो तो महाराष्ट्रामध्ये याची प्रचिती संपुर्ण महाराष्ट्राने या घटनेस्वरूपात पाहिली आहे , याच पार्श्वभूमीवर भिगवन पोलीस स्टेशन येथे भिगवण पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांच्याकडे समस्थ मातंग बांधव भिगवन यांच्या वतीने निवेदन देऊन घटनेचा जोरदार निषेध केला
मौजे बोरजुनी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील मातंग समाजाचा लखन बालाजी भंडारे व गोळेगाव येथील धनगर समाजाची संजीवनी कमळे या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून जातीवादी हेतूने दोघांची गावातून धिंड काढून क्रूरपणे बांधून विहिरीत फेकल फक्त जात मातंग आहे म्हणून हा केवढा अमानुष अत्याचार केवढी मोठी विषमता ना सरकारला खबर अतिशय भयानक परिस्थिती प्रेमाला कुठे जात असती का?
सरकार का गप्प आहे? देवेंद्र फडणवीस,अजित दादा पवार, एकनाथ शिंदे या प्रकरणावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागेल? या दोघांचा खून वाया जाऊ देणार नाही , तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व मनुष्य वधाचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाज मोठे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असे आवर्जून निवेदन देताना सांगितले याप्रसंगी निवेदन देण्याकरता मातंग समाज अध्यक्ष कृष्णा भिसे राजू गाडे पाटील अनिकेत भिसे , कपिल लांडगे सचिन खटके , आजिनाथ पवार सह समस्त मातंग समाज उपस्थित होता
–
