अखेर लालबागच्या राजाने आपले अस्तित्व दाखवले
मुंबई/ प्रतिनिधी
देवाबद्दल काही नागरिक मनामध्ये संभ्रह निर्माण करतात आशा नागरिकांसाठी खरोखरच हा लालबागच्या राजाचा विसर्जनाचा काळ हा नक्कीच विचार करणारा लावणार आहे,,,, वास्तविक पाहता लालबागचा राजाच विसर्जन करण्याकरता 33 तासाचा वेळ का लागला , ही विचार करण्याची गोष्ट आहे याचाच छोटासा आढावा आमच्या प्रतिनिधी घेतला आहे विसर्जनासाठी समुद्राच्या भरती ओहोटीचे कारण देण्यात आले होते मात्र तेथील इतर मंडळाचे गणपती विसर्जन लालबागचा राजा नंतर झाली ते कसे काय झाले, त्याचप्रमाणे लालबागच्या राजाचे विसर्जन चंद्रग्रहणात झाले ते शुभ की अशुभ ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे , विसर्जन करण्याकरता जे साधनसामुग्री आहे ती गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले गेले होते तरी देखील विसर्जन करण्याकरता मूर्ती उचलली गेली नाही, कारण काय, मंडळाचे कार्यकर्ते हात जोडून बाप्पांना विनंती करत होते, मात्र आती करेन त्याची मातीत होईल हे अगदी सत्य कोणी नाकारू शकत नाही यंदा मंडळाच्या सदस्यांनी नियोजन काही वेगळेच केले होते, 365 दिवस चालणारे अन्नछत्र मराठा बांधवांसाठी बंद केले, देव दर्शनासाठी गरीब आणि श्रीमंत अशा रांगा लावल्या, गरिबांना लगेच मंदिरातून हाकलून द्यायचे व श्रीमंतांसाठी वेळ द्यायचे अशा किती आणखी चुका म्हणायच्या, हे देवाघरी मुळीच खपणार नव्हतं याच दुटप्पी भूमिकेमुळे, ज्यांनी लालबागच्या राजाला खऱ्या अर्थाने बसवण्याची प्रथा चालू केली होती त्या कोळी बांधवांनी याच कारणास्तव मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या नियोजनावर बहिष्कार घातला होता, अशा आणखी किती चुका बाप्पा सहन करणार , शेवटी मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोळी बांधवांना कसेतरी विनवणी करून पाचारण करावे लागले आणि या बांधवांच्या हस्ते बाप्पाने 33 तासाच्या नंतर विसर्जन करून घेतले या गोष्टीला तर नक्कीच योगायोग म्हणता येणार नाही,,, शेवटी एवढेच म्हणावे लागेल की देवा समोर गरीब उच नीच जात किंवा धर्म कुठलाच नसतो धर्म असतो तो केवळ मनुष्य याची प्रचिती नक्कीच लालबागचा राजांनी संपूर्ण जगाला दाखवून दिली हे वास्तव कोणीच नाकार शकत नाही,,,
