खऱ्या अर्थाने बहु चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे , पंचायत समिती जिल्हा परिषद गन जाहीर झाल्याने तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे कार्यकाल पाठीमागेच संपल्याने निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होत तसेच उमेदवार मध्ये रस्सीखेच सुरू आहे या गोष्टीला आत्ता पूर्णविराम मिळाला असून निवडणूक अधिकाऱ्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे तसेच इतर निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे जाहीर केले आहे या निवडणुका ऑक्टोंबर नंतर होण्याचे जाहीर केले असून डिसेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. अशी माहिती दिलेली असून निवडणूक वेळी मतचिठ्ठी असणार नाही याचाही निर्वाळा निवडणूक अधिकाऱ्याने केला आहे, कारण जास्त प्रमाणात निवडणूक असल्याने एवढ्या प्रमाणात मत चिट्टी देणे शक्य नसल्याचे सांगितले
खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगुल वाजल्याने उमेदवारा मध्ये उमेदवाराचे माळ कोणाच्या गळ्यात पडते यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी लॉबीग पाहावयास मिळणार आहे हे मात्र नक्कीच…..